Ad will apear here
Next
चंद्रपूरचे विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला


नागपूर : आदिवासी विकास विभाग व महाराष्ट्र पोलिसांमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेंतगर्त चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची पहिली सहल महाराष्ट्र दर्शनाला निघाली आहे. या सहलीची सुरुवात नागपूरपासून झाली.

नक्षलग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना राज्यातील औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषीविषयक प्रगती यांचे दर्शन घडवून आणणे व त्यांच्या सार्वांगिण व्यक्तिमत्वाचा विकास साधणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ही सहल आयोजित करण्यात येते. या अंतर्गत आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या २२ सहली आयोजित केल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच सहल आहे. नक्षलविरोधी अभियानाचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे व चंद्रपूर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ही सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीत विविध आश्रमशाळांमधील ४५ मुली व १५ मुले अशा एकूण ६० मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. यात चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र मडावी, महिला पोलीस उपनिरीक्षक ढाले यांच्यासह पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई व आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सहलीला चंद्रापुरातून हिरवा झेंडा दाखविल्यानंतर त्यांचे नागपुरात आगमन झाले. तेथे या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर, दीक्षाभूमी, सुराबर्डी येथील आश्रम यांसह विविध ठिकाणी भेटी दिल्या. पुढे ही सहल नाशिक, मुंबई आदी शहरांना भेटी देऊन त्या ठिकाणची माहिती जाणून घेणार आहे.

या वेळी सहलीत सहभागी झालेले विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘यापूर्वी आम्ही कधीही चंद्रपूर जिल्ह्याबाहेर गेलो नाही. आश्रमशाळेतच शिक्षण व राहण्याची सोय असल्यामुळे इतर शहरांशी आमचा कधीही संबंध आला नाही; मात्र महाराष्ट्र दर्शन सहलीच्यानिमित्ताने प्रथमच नागपूर शहर पहायला मिळाले. विमान पाहण्याचा आनंदही वेगळाच होता.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZWEBX
Similar Posts
‘खेळाडूंनी स्वत:च्या गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे’ गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत दर वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडापूरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्ह्यात विभागीय क्रीडा संमेलन झाले
नागपूर येथे सरपंच, ग्रामसेवकांचा मेळावा नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव्य असलेल्या गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोचवण्याच्या हेतूने आदिवासी भागातील पारशिवनी, रामटेक, मौदा व सावनेर तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांचा मेळावा आयोजित करण्यात आल आहे. मेळाव्याचे उद्घाटन खासदार कृपाल तुमने यांच्या हस्ते होईल
उष्म्यातून थोडासा दिलासा पुणे : सध्या देशासह राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे नागरिक कमालीच्या उकाड्याने हैराण झाले आहेत मात्र आगामी एक-दोन दिवसांत विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागांत तापमान काहीसे घटण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  मध्य महाराष्ट्र व विदर्भात
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ४४ हजार ईव्हीएम, २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. आठवडाभरावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर एक कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language